केज/प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्याचे हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त केज येथे ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि योजनांचे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परभणी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक श्री. गुट्टे , उपजिल्हाधिकारी श्री. पवार गटविकास अधिकारी श्री. नागरगोजे तसेच विभागीय कृषी अधिकारी श्री. गायकवाड उपस्थित होते.
तसेच कृषी क्षेत्रातील विविध योजनांची माहिती देण्यासाठी ‘आत्मा’ बीडचे उपसंचालक श्री. पाटील , तालुका कृषी अधिकारी श्री. पठाडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर . या प्रसंगी केज परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधुनिक शेतीची काळाची गरज: मान्यवरांचे प्रतिपादन
कार्यक्रमात बोलताना परभणी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक श्री. गुट्टे सर यांनी बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यावर सविस्तर प्रकाश टाकला. उपस्थित इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कै. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.

